स्टेन्ड ग्लासची आकर्षक सजावट

आशा नगरकरपुणे : अमेरिकेत गेल्या पन्नास वर्षांपासून मराठी कुटुंब स्थिरावली आहेत. त्यात बोस्टन म्हणजे जणू काही अमेरिकेतील पुणेच! या शहरात विवेक आणि प्रज्ञा नगरकर यांच्याकडे मोठ्या थाटामाटत गौरी आणि गणपती बसवले जातात. नगरकर कुटुंब गेली ३२ वर्षे बोस्टनमध्ये गणेशोत्सव साजरा करीत आहेत. गणेशाची ही मूर्ती १९६५ मध्ये दांडेकर यांनी पुण्यातून अमेरिकेला आणली होती. दर वर्षी उत्सवामध्ये पारंपरिक वेशामध्ये लहान मुली आणि मोठी माणसे सहभागी होतात. या वर्षी देखील मराठी बांधवांचा उत्साह उल्लेखनीय होतात. दोन दिवसांत दीडशे लोकांनी बाप्पाचे दर्शन घेतले. उत्सवानिमित्त दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते.यंदा उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे रंगीत काचेमध्ये (स्टेन्ड ग्लास) केलेली सजावट. या वेळी स्टेन्ड ग्लासमध्ये अष्टविनायक रेखाटण्यात आले होते. प्रज्ञानगरकर यांना स्पेनमधील ‘संग्राडा फॅमिलिय’ या चर्चमधील स्टेन्ड ग्लासच्या खिडक्या पाहून ही कल्पना सुचली. विवेक नगरकर यांनी एका प्राचीन मंदिराची कमान कागदावरकाढून भारत, जर्मनी, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियातील नातेवाइकांना पाठवली होती. त्यानंतर विवेक यांनी स्टेन्ड ग्लास कशी बनवायची याचा अभ्यास करून तरुण मुलांच्या मदतीने स्टेन्ड ग्लास बनविण्याचा प्रयोग यशस्वी केला. विशेष म्हणजे ९२ वर्षांच्या आमच्या आईचा आवर्जुन उल्लेख केला पाहिजे. तिने पुण्यातून ठिपक्यांची रांगोळी कागदावर काढ्न त्याचा फोये बोस्टनला पाठवला. या रांगोळीचीही स्टेन्ड ग्लास करण्यात आली. ती गणपतीपुढे ठेवली. त्यामुळेआमचे वडिल कै. विनायक नगरकर यांनी दिलेला गणेशोत्सवाचा वारसा आता आमची पिढी उत्साहाने साजरा करते आहे. बोस्टन येथील सात कुटुंबातील नातेवाइक आणि गणेशोत्सव साजरा करण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नातलग मंडळींच्या सहभागातून उत्सव साजरा झाला