August 25

मंगळवार, दि. २५ अगस्त २०२०

दिवस चौथा : आज गौरी आवाहन !

आज मंगळवार, २५ ऑगस्ट ! आज गौरी आवाहन आहे. ज्येष्ठागौरी चंद्र अनुराधा नक्षत्रात असतांना आणतात. ज्येष्ठात नक्षत्रात त्या पुजतात आणि चंद्र मूळ नक्षत्रात असतांना ज्येष्ठागौरींचे विसर्जन केले जाते. आज दुपारी १ वाजून ५८ मिनिटांनंतर चंद्र अनुराधा नक्षत्रात गेल्यानंतर ज्येष्ठा गौरींचे आगमन होणार आहे.

मंगळवार, दि. २५ अगस्त २०२०

दिवस चौथा : आज गौरी आवाहन !

आज मंगळवार, २५ ऑगस्ट ! आज गौरी आवाहन आहे. ज्येष्ठागौरी चंद्र अनुराधा नक्षत्रात असतांना आणतात. ज्येष्ठात नक्षत्रात त्या पुजतात आणि चंद्र मूळ नक्षत्रात असतांना ज्येष्ठागौरींचे विसर्जन केले जाते. आज दुपारी १ वाजून ५८ मिनिटांनंतर चंद्र अनुराधा नक्षत्रात गेल्यानंतर ज्येष्ठा गौरींचे आगमन होणार आहे. गौरी म्हणजे हिमालयाची कन्या, भगवान शंकराची पत्नी आणि गणपतीची माता पार्वती होय.ही उमा, दुर्गा, अपर्णा,चंडी, चामुंडा, काली, कपालिनी, भवानी, अंबिका, हेमवती, ईश्वरी, सर्वमंगला, दाक्षायणी, गिरिजा, विजया, महालक्ष्मी इत्यादी अनेक नावांनी ओळखली जाते. ज्येष्ठागौरी ही आदिशक्ती मानली जाते. प्राचीनकाली शक्तीची उपासना करणार्यांना ‘ शाक्तपंथीय ‘ म्हणून ओळखले जात असे.
शिवापासून शक्ती आणि शक्तीवाचून शिव राहूच शकत नाही. देवीच्या स्तुतिपर कवन म्हणजे स्तोत्र अशी स्तोत्राची व्याख्या केलेली आहे. आद्य शंराचार्यांनी देवीची अनेक स्तोत्रे रचली.त्यामध्ये ‘ सौंदर्यलहरी’ हे प्रसिद्ध आहे. सृष्टिनिर्मिती या आदिशक्तीमुळेच झाली. कालिदासाच्या कुमारसंभवतात पार्वतीने केलेल्या तपश्चर्येचे सुंदर वर्णन केले आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात शेतात नवीन धान्य तयार होत असते. म्हणून गौरी ‘ धान्यलक्ष्मीच्या’ रूपात घरात प्रवेश करते. सासरी गेलेली मुलगी गौरीच्या सणासाठी माहेरी येत असते. “ गौराई माझी लाडाची गं !” असं म्हणत आपल्या मुलीचे स्वागत करीत असते.
आज गौरी आवाहनाचा दिवस परंपरेप्रमाणे गौरी तयार करण्याचा असतो. काही लोक खड्याच्या ज्येष्ठागौरी आणतात. तर काही लोक परंपरेप्रमाणे गौरींचे मुखवटे तयार करून ठेवतात. काही लोकांच्या घरी गौरीची सुंदर मूर्ती तयार करतात. तर काही लोक मुळासकट तेरडा वनस्पती ज्येष्ठागौरी म्हणून तयार ठेवतात. परंपरा पाळल्या जात असतात. माता गौरी आणि गणपतीची आज भेट होत असते. गणपती हा मातृभक्त होता. मातृदेवता २१ आहेत म्हणून गणपतीला एकवीस हा अंक जास्त प्रिय आहे. ज्येष्ठा गौरी एकटीच येत नसते तर तिच्याबराबर तिच्या सखी देखील येत असतात. परंपरेप्रमाणे हे होत असते. काही ठिकाणी गौरीमध्ये असलेल्या श्रीमहालक्ष्मी, श्रीमहासरस्वती आणि श्रीमहाकाली यांची पूजा केली जाते. परंपरा जपणे हे याबाबतीत कटाक्षाने पाळले जात असते.