August 26

बुधवार, दि. २६ अगस्त २०२०

दिवस पाचवा : आज गौरीपूजन !

आज बुधवार, २६ ऑगस्ट, आज गौरीपूजन ! आजचा गौरीपूजनाचा दिवस महिलांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा
असतो. कारण आज गौरीला नैवेद्य अर्पण करावयाचा असतो. परंपरेप्रमाणे या नैवेद्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काही लोक पुरणाचा नैवेद्य अर्पण करतात, तर काही लोक १६ प्रकारच्या भाज्या, १६ प्रकारच्या चटण्या, १६ प्रकारच्या कोशिंबीरींचा आणि पक्वांन्नांचा नैवेद्य देवीलालअर्पण करतात. माहेरी आलेल्या लेकीला कोणता पदार्थ आवडतो हे आईला माहित असते. आई माहेरी आलेल्या लाडक्या गौरीचे लाड पुरवत असते.

बुधवार, दि. २६ अगस्त २०२०

दिवस पाचवा : आज गौरीपूजन !

आज बुधवार, २६ ऑगस्ट, आज गौरीपूजन ! आजचा गौरीपूजनाचा दिवस महिलांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा
असतो. कारण आज गौरीला नैवेद्य अर्पण करावयाचा असतो. परंपरेप्रमाणे या नैवेद्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत.
काही लोक पुरणाचा नैवेद्य अर्पण करतात, तर काही लोक १६ प्रकारच्या भाज्या, १६ प्रकारच्या चटण्या, १६
प्रकारच्या कोशिंबीरींचा आणि पक्वांन्नांचा नैवेद्य देवीलालअर्पण करतात. माहेरी आलेल्या लेकीला कोणता पदार्थ
आवडतो हे आईला माहित असते. आई माहेरी आलेल्या लाडक्या गौरीचे लाड पुरवत असते.
भारतात फार प्राचीन कालापासून गौरीचे पूजन केले जात असले तरी हे सर्व पूजन पोथ्यांचे-पुराणातच राहिले
असे दुर्दैवाने म्हणावे लागते. शक्तीचे हे पूजन फक्त देवघरातच राहिले. ते स्वयंपाकघर,माजघरापर्यंत किंवा घराच्या
उंबरठ्याच्या बाहेर आलेच नाहीअसे दिसून येते. घरात वावरणार्या आजी, आई, मुलगी, बहीण, पत्नी, सून , नात या
जिवंत शक्ती देवता तशाच दुर्लक्षित राहिल्या याचे वाईट वाटते. त्याकाळी परकीय आक्रमणांमुळे वाटणारी
असुरक्षितता हे जरी कारण सांगण्यात येत असले तरी यातूनही  मार्ग काढता आला असता. प्रत्यक्षातील ही आद्यशक्ती
तशीच दुर्लक्षित राहिली. बालवयात होणारे विवाह, पतीच्या मृत्यूनंतर महिलेचे होणारे हाल, महिलांवर होणारे
अत्याचार हा काळ जास्त दूरचा नाही. तर फक्त दीड-दोनशे वर्षांपूर्वीचा आहे. १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथे
भिडे वाड्यात जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. खरं म्हटलं तर तेथूनच
खर्या ‘ गौरी पूजनाचा ‘ प्रारंभ झाला असं म्हणता येईल. स्त्रीशक्तीची कर्तबगारी स्त्रियांच्या शिक्षणामुळे दिसून येऊ
लागली. स्त्रीशिक्षणामुळे समाज परिवर्तनाला खरी सुरुवात झाली.  साहित्य, संगीत,कला, कायदा, शिक्षण, राजकारण,
आरोग्य, क्रीडा, विज्ञान तंत्रज्ञान , संरक्षण, उद्योगव्यवसाय, संशोधन इत्यादी सर्वच क्षेत्रात
‘ गौराईनी ‘ आपले देवत्त्व- कर्तृत्त्व सिद्ध करून दाखविले आहे. परंतू अजुनही जनजागृतीची गरज आहे.