August 31

सोमवार, दि. ३१ अगस्त २०२०

दिवस दहावा : आज पक्ष प्रदोष !

आज सोमवार, ३१ ऑगस्ट, गणेशोत्सवामधील दहावा दिवस ! या कोरोनाच्या संकटातही आपण हा उत्सव कसा साजरा करीत आहोत याची परिक्षा साक्षात् श्रीगणेश घेत असावा. शिस्त व सर्व नियम पाळूनच आपण आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव साजरा करीत आहोत.

सोमवार, दि. ३१ अगस्त २०२०

दिवस दहावा : आज पक्ष प्रदोष !

आज सोमवार, ३१ ऑगस्ट, गणेशोत्सवामधील दहावा दिवस ! या कोरोनाच्या संकटातही आपण हा उत्सव
कसा साजरा करीत आहोत याची परिक्षा साक्षात् श्रीगणेश घेत असावा. शिस्त व सर्व नियम पाळूनच आपण आपल्या
लाडक्या बाप्पाचा उत्सव साजरा करीत आहोत.
भारतीय सण- उत्सव हे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी असतात. प्रदूषण करण्यासाठी नसतात. हे सर्व उत्सव
हे ऋतूंवर आधारलेले असतात. निसर्ग , ऋतू आणि सण यांचे एक अतूट नातेच तयार झालेले असते. श्रीगणपती
अथर्वशीर्षामध्ये म्हटले आहे की ‘ त्वंभूमिरापोऽनलोऽ निलोनभ: ।’ ( म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश ही
पंचतत्त्वे तूच आहेस. ) आज आपण या पंचतत्त्वांची म्हणजे पर्यायाने गणेशाच्या निसर्ग रूपाची माहिती करून घेऊया.
पृथ्वी, आप, तेज , वायू आणि आकाश यांना आपण पंचमहाभूते म्हणून ओळखतो. निसर्गातील ही  पाच शक्तिस्थाने
आहेत. ही साक्षात्कारी गणेशरूपे आहेत. निसर्गातील या पंचमहाशक्तींमध्ये साक्षात् श्रीगणेश आहे. निसर्गाची
उपासना म्हणजेच श्रीगणेशाची उपासना आहे. (१) पृथ्वी- प्रथ् म्हणजे विस्तार पावणे. यावरून पृथ्वी हा शब्द बनला
आहे. गंध हा पृथ्वीचा गुण आहे. पृथ्वी हा आपल्या सूर्यमालेतील तिसर्या क्रमांकाचा ग्रह आहे. पृथ्वी सुमारे साडेचार
अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाली. पृथ्वी स्वत:भोवती २३ तास ५६ मिनिटे४ सेकंदात एक प्रदक्षिणा पूर्ण करते. तिचा वेग
मंदावतो आहे. पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. (२) पाणी ( आप )-  आप ही एक वैदिक देवता आहे. जल, नदी यांना वैदिक

आर्य ‘ आप ‘ या नावाने ओळखत होते. द्रवत्व हा जलाचा गुण आहे. जल हेच सर्व वस्तूंच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहे
असे वेदात म्हटले आहे. (३) तेज(अग्नि, सूर्य )- ऊष्ण स्पर्श हा तेजाचा गुण आहे. आपल्या सूर्याचा जन्म सुमारे ५अब्ज
वर्षांपूर्वी झाला. त्यावर हैड्रोजन आहे, त्याचे हिलीयममध्ये रूपांतर होत असते. सूर्य आहे म्हणून पृथ्वीवर जीवसृष्टी
आहे. (४) वायू- वादळे झाली की या शक्तीची जाणीव होते. वायूची उत्पत्ती विश्वपुरुषाच्या श्वासातून झाली असे
ऋग्वेदात म्हटले आहे. स्पर्श हा वायूचा गुण आहे. योगदर्शनात वायूची दहा रूपे सांगितलेली आहेत. (५) आकाश-
१३.७ अब्ज वर्षांपूर्वी एका स्फोटातून विश्वाची निर्मिती झाली. त्याचवेळी काळ, पोकळी, वस्तू यांची निर्मिती झाली.
गणेशपूजा म्हणजेच पर्यावरणाचे रक्षण होय.