September 01

मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२०

दिवस अकरावा : आज अनंत चतुर्दशी !

आज मंगळवार, १ सप्टेंबर , आज अनंत चतुर्दशी आहे. आज गणपती बाप्पा आपल्या सर्वांचा निरोप घेणार !
भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून सुरू झालेला हा गणेशोत्सव आज अनंत चतुर्दशी रोजी संपन्न होत आहे. तसं म्हटलं तर अनंत चतुर्दशीचा आणि गणेशमूर्ती विसर्जनाचा तसा काहीही संबंध नाही. ही दोन्ही व्रते भिन्न आहेत. पण  कधी कधी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशीच महालयारंभ असतो. पितृपक्ष सुरू होतो. यावर्षी तसेच आहे. उद्या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशीच महालयारंभ- प्रतिपदा श्राद्ध आहे.  म्हणून गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस अनंत चतुर्दशीचा मानला जातो.

मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२०

दिवस अकरावा : आज अनंत चतुर्दशी !

आज मंगळवार, १ सप्टेंबर , आज अनंत चतुर्दशी आहे. आज गणपती बाप्पा आपल्या सर्वांचा निरोप घेणार !
भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून सुरू झालेला हा गणेशोत्सव आज अनंत चतुर्दशी रोजी संपन्न होत आहे. तसं म्हटलं तर
अनंत चतुर्दशीचा आणि गणेशमूर्ती विसर्जनाचा तसा काहीही संबंध नाही. ही दोन्ही व्रते भिन्न आहेत. पण  कधी कधी
भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशीच महालयारंभ असतो. पितृपक्ष सुरू होतो. यावर्षी तसेच आहे. उद्या भाद्रपद पौर्णिमेच्या
दिवशीच महालयारंभ- प्रतिपदा श्राद्ध आहे.  म्हणून गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस अनंत चतुर्दशीचा मानला जातो.
आज उत्तरपूजा व आरती झाल्यानंतर गणेशमूर्तीचे विसर्जन करावयाचे आहे. यावर्षी कोरोनामुळे आपल्याला
अनेक बंधने पाळावी लागत आहेत. त्यामुळे यावर्षी  गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुका असणार नाहीत. लहान
गणेशमूर्तींचे घरीच बादलीतील स्वच्छ पाण्यात विसर्जन करावयाचे आहे. मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम
तलावात करावयाचे आहे. जलप्रदूषण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावयाची आहे. आज गणपती
बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन होणार ! प्रत्येकजण भावूक झाला आहे. प्रत्येकजण आपल्या बाप्पाजवळ प्रार्थना करीत
आहे. ‘ बाप्पा, कोरोनाचे संकट लवकर दूर होऊदे !’ विद्यार्थी  ‘परिक्षेत चांगले यश मिळो ‘ अशी प्रार्थना करीत
असतात. आजारी माणसे व वृद्ध चांगल्या आरोग्यप्राप्तीसाठी बाप्पाजवळ प्रार्थना करतात. गणपती बाप्पा हा
सुखकर्ता आहे. दु:खहर्ता आहे. तो आपले दु:ख दूर करून सुख प्राप्त करून देईल असा विश्वास प्रत्येक गणेशउपासकाला
वाटत असतो. तशी त्याची श्रद्धा असते.
गणपतीने अनेक दुष्ट  राक्षसांचा नाश केला. आज वेगळ्या प्रकारचे दुष्ट राक्षस आहेत. ते समाजात जसे आहेत
तसेच आपल्या प्रत्येकामध्ये आहेत. अज्ञान, आळस, अस्वच्छता, अंधश्रद्धा, अनीती इत्यादी राक्षस आपले नुकसान
करीत असतात. गणेशाचे गुण आपल्या अंगी आणून आपल्यालाच आपल्यामधील राक्षसांचा नाश करावयाचा आहे.
काम, क्रोध, लोभ, मोह. मद, मत्सर या षड्रिपूना नियंत्रणात ठेवायचे आहे. या रिपूंमध्ये टीव्ही, मोबाइल, व्हाटस्अप
आणि फेसबुक यांची भर पडली आहे. यांच्यामुळे घरांमधील माणसांचा संवादच  बंद झाला आहे. ही साधने उपयुक्त
आहेत परंतू त्यांच्या वापरावर नियंत्रण असणे जरूरीचे आहे.
गणपतीबाप्पाला निरोप देताना “ गणपती बाप्पा मोरया , पुढच्यावर्षी लवकर या ! “ अशी प्रार्थना आपण
करतो. परंतू पुढच्यावर्षी बाप्पा १८ दिवस उशीरा म्हणजे शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ रोजी येणार आहे हेही
तितकेच खरे आहे.