....हा तर एकोप्याचा उत्सव

....हा तर एकोप्याचा उत्सव Image

सचिन माळी, मेमफिस महाराष्ट्र मंडळ, टेनेसी, अमेरिकामहाराष्ट्रापासून कितीही दूर राहावे लागले तरीजिथे जाऊ तेथे आपले सण साजरे करण्याचा उत्साह मराठ्यमोळ्या तरुणांनी जपला आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये आज महाराष्ट्र मंडळ कार्यरत आहेत. वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या मंडळांपैकी एक मंडळ म्हणजे मेमफिस महाराष्ट्र मंडळ. गणेशोत्सवाची चाहूल लागली, की महाराष्ट्रात जशी लगबग सुरू होते, तशीच धावपळ मेमफिसमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबांमध्ये बघायला मिळते. मेमफिसमध्येही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला पाहिजे, या उद्देशाने महाराष्ट्र मंडळाने दहा वर्षांपूर्वी गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. । अमेरिकेतील टेनेसी या राज्यातील मेमफिस हे एक सुंदर शहर. या भागात भारतीय लोकांची संख्यामोठी आहे. नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रापासून दूर यावे लागले, तरी आपले सण साजरे झालेच पाहिजेत, याबद्दलमंडळाचे कार्यकर्ते आग्रही आहेत. त्यामुळे मेमफिस महाराष्ट्र मंडळात गुढीपाडवा, संक्रांत, रामनवमी,दसरा, दिवाळी, असे सगळे सण उत्साहात साजरे केले जातात. गणेशोत्सव हा या मालिकेतील महत्त्वाचा सण. मंडळाने दहा वर्षांपूर्वी गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. मंडळातील बहुतांश मराठी बांधवांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे मंडळाचा उत्सव एक दिवसाचा असतो. या दिवशी मराठी लोकांबरोबरच भारतातील विविध राज्यांतीलबांधवही सहभागी होतात. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळे उत्साहाने विविध जबाबदारी उचलतात. उत्सवाच्या दिवशी लहान मुले, मोठ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, आरती तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजनअसते. यासाठी दर वर्षी एक संकल्पना निश्चित केली जाते. या वर्षी ‘युनिटी इन डायव्हर्सिटी’ ही संकल्पना आहे. उत्सवाला पाचशेहून अधिक नागरिक सहभागी होतात. दर वर्षी नागरिकांची संख्या वाढतेच आहे. महाराष्ट्रात गणपतीचे आगमन चार दिवसांपूर्वीच झाले आहे; पण मेमफिसमध्ये पुढच्या शनिवारी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. आयसीसीटी इंडियन कल्चरल सेंटर अॅण्ड टेम्पल यांनी गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. मंडळाचे कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत. बाप्पाच्या स्वागतासाठी मंडळातर्फे मंडळातील हौशी कार्यकत्यांनी महिनाभरापासून वाद्य वादनाचा सराव केला आहे. मिरवणुकीनंतर गणपतीची प्रतिष्ठापना करून यथोचित पूजा करण्यात येणार आहे. या वेळी मंडळाच्या सभासदांनी बसविलेले सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. स्नेहा पाटील, अमित गंगाखेडकर, दीप्ती भंडारे आणि निधी माळी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. गणेशोत्सवाच्या नियोजनात अनेक हातांनी मदत केली आहे. (लेखक मेमफिस येथील महाराष्ट्रमंडळाचे अध्यक्ष आहेत.)शब्दांकन : चैत्राली चांदोरकर

उत्सवाची शतकाकडे वाटचाल

नोकरी आणि व्यवसायानिमित्तविविध राज्यात गेलेल्या मराठी मंडळींनी फार पूर्वीच महाराष्ट्र मंडळ स्थापन केली. मराठी बांधवांनी एकत्र राहिले पाहिजे, एकमेकांना मदत करण्यासाठी तर कधी एकत्र येऊन आनंद साजरा करण्याच्या उद्देशाने ही मंडळे उभी राहिली. विविध देशांतील महाराष्ट्र मंडळांप्रमाणेच देशातील विविध राज्यातही महाराष्ट्र मंडळांचे जाळे विस्तारलेले आहे. या जुन्या मंडळांपैकी एक म्हणजे बेंगळुरू येथील महाराष्ट्र मंडळ. २०२० मध्ये मंडळाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. मंडळाच्या स्थापनेपासूनच गणेशोत्सवाला सुरुवात झाल्याने यंदा उत्सवाचे ९८ वे वर्ष आहे. पढचीदोन वर्षे आमच्यासाठी ऐतिहासिक ठरणार असन, वर्षभर बहुरंगी कार्यक्रम आयोजित करणार आहोत.विविध कारणास्तव बेंगळुरूत वास्तव्यास आलेल्या हौशी मराठी बांधवांनी ९८ वर्षांपूर्वी महाराष्ट्र मंडळ स्थापन केले. काळानुसार मंडळाच्या कामकाजात, सादरीकरणात बदल होत गेले. पण सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा आजही कायम आहे. मध्यवर्ती शहरात मंडळाची स्वतःची वास्त आहे. सुसज्ज हॉल आहे. त्यामुळे आमचे सगळे कार्यक्रम तिथेच होतात. मंडळाचे आज एक हजारांहून अधिक कुटुंब सदस्य आहेत. एरवी नोकरीमुळे सगळ्यांना भेटणे शक्य होतेच असे नाही, पण गणेशोत्सवाच्यादहा दिवसांत प्रत्येक जण आपापल्या सोयीने उपक्रमात सहभागी होते. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा संपूर्ण उत्सव आम्ही मंडळात साजरा करतो. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील मराठी बांधव या उपक्रमात उत्साहाने सहभागी होतात.यंदा आम्ही पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करीत आहोत. उत्सवासाठी गणपतीची पितळीची मूर्ती आणली आहे. विसर्जनासाठी बीज गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. या मूर्तीमध्ये विविध झाडांच्या बिया वापरल्या असून, कुंडीत मृर्तीचे विसर्जन केल्यावर त्यात रोपे येतील. दर वर्षीप्रमाणे गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी वाजतगाजत मिरवणूक काढली. विश्राम नांदेडकर आणिराज्याराज्यातील (बाप्पासहकलाकारांचा पोवाडा, उल्हास राणे आणि त्यांच्या टीमचे निसर्गमैत्री या विषयावर व्याख्यान, अंताक्षरी आणि शब्दवेध स्पर्धा, युवर ओन थिएटरचा आधे अधुरे हा कार्यक्रम, बच्चे कंपनीसाठी एक उनाड दिवस हा कार्यक्रम यांसह अनेकसांस्कृतिक कार्यक्रमआयोजित करण्यात आले आहेत. याविविध गुणदर्शनासाठी आम्ही एक संकल्पनानिश्चित करतो आणि त्यानुसार मंडळाचे सभासद कार्यक्रम बसवतात. या वर्षी दशकोत्सव ही संकल्पना ठरली असून, प्रत्येकाला गेल्या सत्तर दशकातील काळ मांडणारी कलाकृती सादर करण्याचे आव्हान देण्यात आले आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या दिवशी विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण आणि गणेश विसर्जन होणार आहे. (लेखिका बेंगळुरू येथील महाराष्ट्र मंडळाच्याअध्यक्ष आहेत.) (शब्दांकन चैत्राली चांदोरकर)