August 22

शनिवार, दि. २२ अगस्त २०२०

दिवस पहिला : आज श्रीगणेश चतुर्थी !

आज शनिवार, २२ ऑगस्ट भाद्रपद शुक्ल चतुर्थी श्रीगणेश चतुर्थी! पार्थिवगणेशपूजन करावयाचे आहे. आज माध्यांन्हकाळी गणेशस्थापना व पूजन करावयाचे आहे. दिनमानाचे पाच भाग करायचे. त्यांना अनुक्रमे प्रात:काळ,संगवकाळ,माध्यान्हकाळ, अपराण्हकाळ आणि सायंकाळ असे म्हणतात. आज सकाळी ११-२५ पासून दुपारी १-५६ पर्यंत माध्यान्हकाळ आहे.

जर कुणाला यावेळेत गणेश स्थापना व पूजन करता आले नाही तर पहाटे ५ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत केले तरी चालेल. गणेश चतुर्थीला पार्थिव गणेशपूजन करायला सांगितले आहे. पार्थिव म्हणजे मातीचीच गणेशमूर्ती पाहिजे. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गणेशमूर्ती मातीचीच हवी आहे. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून मूर्तीत देवत्त्व आणले जाते व मूर्ती विसर्जनापूर्वी उत्तरपूजेच्यावेळी ते देवत्त्व काढून घेतले जाते. मूर्ती छोटी पण भक्ती व श्रद्धा मोठी हवी.
गणेशपूजा आपण का करतो ? तर गणपतीचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी आपण गणेशपूजन करीत असतो.गणपती हा चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती आहे. आपणही आयुष्यात विद्या-कला शिकून घ्यायला पाहिजेत. गणपती हा सुखकर्ता आहे. तो दु:खहर्ता आहे. आपणही आपल्या आणि इतरांच्या आयुष्यातील दुःख दूर करून सुख आणण्यासाठी समर्थ व्हायला पाहिजे. गणपती हा गणांचा नायक आहे. नेतृत्त्वगुण आपल्या अंगी आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.
यावर्षी कोरोनामुळे आप्तेष्ट मित्रांना गणेशदर्शनासाठी बोलावता येणार नाही. त्याना आॅनलाइन ॲपवरून गणेशदर्शन घडविता येईल. तसेच पूजा, आरती, सहस्रावर्तन यातही सहभागी करून घेता येईल. शिस्त व नियम यांचे आपण सर्वांनी पालन करणे जरूरीचे आहे.
Read more