- +1 (212)-695-1962
- info@elementskit.com
- 463 7th Ave, NY 10018, USA
लष्करपरिसरातील कॉस्मोपॉलिटन’ संस्कृती खऱ्या अर्थाने जोपासणारे आणि वायफळ खर्चाना फाय देऊन पदरमोड करून विविध सामाजिक उपक्रम राबविणारे गणेश मंडळ ही शिवराम तरुण मंडळाची ओळख. गणरायाचा उत्सव साधेपणाने साजरा करून स्वखर्चातून वंचितांना मदतीचा हात देण्याचा वारसा जपणारे हे मंडळ यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून गणेशोत्सवाचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य करण्याचा मंडळाचा मानस आहे.महात्मा गांधी रस्ता हा लष्कर परिसराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ता. या रस्त्यावरील सैफी लाइन येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते शिवराम राजगे यांचे एका अपघातात निधन झाले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी १९७० मध्ये हे मंडळ स्थापन करण्यात आले. मंडळाच्या स्थापनेसाठी या परिसरातील विविध जाती-धर्माचे रहिवासी एकत्र आले होते. आजही मंडळाचे कार्यकर्ते अभिमानाने ही सर्वधर्मीय संस्कृती जपून गणपती बाप्पाचा उत्सव दहा दिवसमनोभावे साजरा करतात. ‘मुळात लष्कर परिसर ‘कॉस्मोपॉलिटन आहे. त्यामुळे मंडळातही सर्वधर्मीयांचे प्रतिनिधित्व आहे. या परिसरातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बोहरी समाजाचे रहिवासी दर वर्षी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात,’ असे आवर्जून नमूद करून मंडळाचेअध्यक्ष आसिफ शेख यांनी मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. मंडळातर्फे गेल्या १८ वर्षांपासून गणेशोत्सवात दहा दिवस अन्नदान केले जाते. याशिवाय गरजू महिलांना साड्यावाटप, अपंगांना तीनचाकी सायकलींचे वाटप, आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना लकट वाटप केले जाते. त्यासाठी वर्गणी गोळा केली जात नाही. मंडळाचे कार्यकर्ते हाती घेतलेला बोरवणकर यांच्या कार्यकाळात विघ्नहर्ता न्यासातर्फे मंडळाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते, असे मंडळाचे प्रमुख रमेश विचारे यांनी सांगितले. यंदाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त रविवार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली. (संकलन: वरद पाठक)