- +1 (212)-695-1962
- info@elementskit.com
- 463 7th Ave, NY 10018, USA
भाविकांची विघ्ने हरण करणारा विघ्नहर्ता किंवा माविघ्नेश्वर या नावाने अष्टविनायकांपैकी एक असलेला ओझरचा गणराय प्रचलित आहे. कुकडी नदीच्या विस्तीर्ण पात्राच्या किनारी मंदिर असून, बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी १७८५ मध्ये मंदिराची उभारणी केली. मंदिराचा सभामंडप २० फूट लांबीचा असून, गाभारा १० फूट रुंद आणि १० फूट लांब आहे. सभामंडपाच्या दोन्ही भागांवर छोटेखानी कळस असून, गाभाऱ्यावर उंच कळसाची रचना आहे. मंदिराबाहेरील बाजूस दोन रेखीव दगडी दीपमाळा आहेत. सभामंडपात आतील बाजूने आरशांच्या काचांची आकर्षक सजावट आहे. मंदिराभोवती दगडी तटबंदीची संरक्षक भिंत आहे. गणेशोत्सव काळात ओझरमध्ये कोठेही घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना केली जात नाही.गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या विघ्नहर मंदिरात गणेशोत्सव काळात चार दिवस द्वार यात्रा आणि पालखी उत्सव सुरू असतो. गणेश प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला ओझर येथे द्वार यात्रा सुरू होते. मंदिराच्या पंचक्रोशीत असलेल्या उंब्रज, धनेगाव, शिरोली आणि ओझरची आंबराई या चार गावांत गणेशाची पालखी भाद्रपद प्रतिपदा ते पंचमी या तिथीदरम्यान नेली जाते. यानंतर चार दिवस गणेशजन्मसोहळा साजरा होतो. गणेशजन्माचे कीर्तन झाल्यानंतर दुपारच्या वेळी मांडे, कवडे, जगदाळे कुटुंबीयांकडून शेरण्या व दंडवते घातली जातात. दंडवतांच्या माध्यमातून आणलेल्या शेरणी प्रसादाचे वाटप केले जाते. गणेशजन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला रात्री १२ नंतर छबीना काढून, मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. त्यानंतर गणपतीला पेशवेकालीन पोशाख घातला जातो. गावातील १२ बलुतेदारांची पालखी भाद्रपद शुद्ध पंचमीला निघते. ग्रामप्रदक्षिणेसाठी निघालेल्या पालखी सोहळ्यात ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. गणेशोत्सव काळात रात्री११ ते १२ या वेळेत निरंतर धुपारती होते. त्या वेळी मोरया गोसावी यांची पदे आळवली जातात. गणशजन्मोत्सव हाओझरचा यात्रोत्सव सोहळा म्हणूनच साजरा होत असल्याने गणेश प्रतिष्ठापनेनंतर दोन दिवसांनी येथे लाल मातीवरील कुस्त्यांचा आखाडा भरवला जातो. नावामागची आख्यायिका.. __विघ्नेश्वर मंदिराची आख्यायिका विनासूरराक्षसच्या संदर्भात सांगितली जाते. त्रास देणाऱ्या विघ्नसराचा बंदोबस्त करण्यासाठी तपश्चर्य करणाऱ्या ऋषीमुनींनी गणपतीला साकडे पतले, तेव्हा गणपतीने त्याचा पराभव केला. त्यामुळे विनासूर गणपतीला शरण गेला. त्यावर जेथे जेये गणपतीची पूजा केली जाईल, तेयेन येण्याच्या अटीवर विप्नासुराला सोडून दिले. त्यावर विनासूराने ‘तुमचे नाव घेण्याआधी भक्तांनी माझे नाव प्यावे आणि तुम्ही येवेच वास्तव्य करावे.’ अशी विनंती गणरावारला केली. ही विनंती गणपतीने मन्य केल्याने येथे गणरायाला ‘विघ्नहर’ असे संबोधले जाऊ लागल्याची आख्यायिका प्रचलित आहे.
(संकलन: थमेद्र कार, जुन्नर)