स्वीन्डनमध्ये नाचले ध्वज

तेजल सोनवळकर _ ‘गाव तिथे गणेश मंडळ’ या न्यायाने आता विविध देशातील बहुतांश मोठ्या शहरांत गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे. परदेशातील काही महाराष्ट्र मंडळांनी रौप्यमहोत्सवी वर्षापर्यंत मजल गाठली आहे, तर काही शहरांत नवीन मंडळे सुरू होत आहेत. इंग्लंडमधील स्वीन्डन हे एक मोठे शहर! गेल्या तीन वर्षांपासून या शहरात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.स्वीन्डनमध्ये गेल्या काही वर्षांपासून नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने राहायला आलेल्या भारतीयांची संख्या उल्लेखनीय आहे. गेल्या आठ वर्षांपासून तिथे आपले लोक राहतात. मात्र, पूर्वी या भागात एकही मंदिर नव्हते. त्यामुळे लोक एकमेकांच्या घरी भेट्न अथवा हॉलमध्ये भेटायचे. यातून झालेल्या चर्चेतूनच नागरिकांनी २०१४ मध्ये ‘स्वीन्डन हिंदु टेम्पल ट्रस्ट’ची स्थापना केली. विविध पातळ्यांवर केलेल्या त्यांच्या प्रयत्नानंतर २०१६ मध्ये स्वीन्डनमधील हिंदूंचे पहिले मंदिर स्थापन करण्यात आले. सगळ्यांना एकत्र येण्याची संधी मिळावी, या उद्देशाने मंदिरात सांस्कृतिक केंद्रही सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे या मंदिरामुळे तब्बल १५ हजारांहून अधिक हिंदू कुटुंबे एकत्र आली. या केंद्रामुळे भारतातील सर्व भाषिकांच्या स्नेहमेळाव्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले. मंदिराने आता तिसऱ्या वर्षात पदार्पण केले आहे. उत्साही लोकसहभागामुळे मंदिरात वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. योग ध्यानधारणा वर्ग, बुद्धिबळ वर्ग महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या कार्यशाळा,भजन वर्गही येथे घेतले जातात.हे सर्व वर्ग सगळ्यांसाठी मोफत सुरू असतात. अनेकदा या भागातील स्थानिक लोकही या मंदिरात धार्मिक उपक्रमांत; तसेच कार्यशाळांत सहभागी होतात. मंदिरातील सर्व जबाबदाऱ्या भारतीय नागरिक कोणत्याही मोबदल्याशिवाय पार पाडत आहेत. या मंदिरातील सर्वांत मोठा उपक्रम म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव! या उत्सवाचे यंदा तिसरे वर्ष होते. या उत्सवाची संकल्पना पहिल्यांदा मूळचे लातूरचे असलेले; पण सध्या स्वीन्डनमध्ये राहणारे मंदिराचे संस्थापक सदस्य आशिष चन्नावर यांनी मांडली. पहिल्याच वर्षी उत्सवाला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यंदा मंदिरात सलग तिसऱ्या वर्षी गणेशोत्सव साजरा झाला. यासाठी चन्नावार यांनी भारतातून इको फ्रेंडली मूर्ती आणली होती. गणपतीच्या स्वागतासाठी काढलेल्या मिरवणुकीत ‘महाराष्ट्र मंडळ लंडन ढोल बिट्स’ हे पथक सहभागी झाले होते. भगवे झेंडे घेऊन पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला, पुरुष आणि बच्चेकंपनीने सगळ्यांचे लक्ष वेधले. यंदाच्या आनंदोत्सवात फूड फेस्टिव्हल आणि सांस्कृतिक उपक्रम हे आकर्षण होते. या वेळी आम्ही सगळ्याजणींनी ३०० मोदक तयार केले. भारतीय खाद्यजत्रेत महाराष्ट्रीय, पंजाबी, गुजराती, दिल्ली, ओडिशा, राजस्थान,दाक्षिणात्य राज्यांतील वैशिष्ट्य असलेल्या पदार्थांचे स्टॉल मांडण्यात आले होते. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण रंगले. मेंदी, फेस पेंटिंग असे वेगवेगळे स्टॉल्स लहान मुलांसाठी मांडले होते.अपणां पेडणेकर, अश्विनी महाजन, गीता मुंदडा आदीनी यासाठी सहकार्य केले. सायंकाळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात लहान मुलांचे कार्यक्रम, गायन, भजन असे विविध कार्यक्रम झाले. ढोल-ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढून बाप्पाला निरोप देण्यात आला. या कार्यक्रमात १६०० पाउंड देणगी उत्सवासाठी जमा झाली. स्वीन्डन हिंदू मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप भारद्वाज यांचा सक्रिय सहभाग होता. वर्षभर असेच विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. (लेखिका स्वीन्डनमधील गणेशोत्सवाच्यासभासद आहेत.) (शब्दांकन : चेत्राली चांदोरकर)

....हा तर एकोप्याचा उत्सव

....हा तर एकोप्याचा उत्सव Image

सचिन माळी, मेमफिस महाराष्ट्र मंडळ, टेनेसी, अमेरिकामहाराष्ट्रापासून कितीही दूर राहावे लागले तरीजिथे जाऊ तेथे आपले सण साजरे करण्याचा उत्साह मराठ्यमोळ्या तरुणांनी जपला आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये आज महाराष्ट्र मंडळ कार्यरत आहेत. वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या मंडळांपैकी एक मंडळ म्हणजे मेमफिस महाराष्ट्र मंडळ. गणेशोत्सवाची चाहूल लागली, की महाराष्ट्रात जशी लगबग सुरू होते, तशीच धावपळ मेमफिसमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबांमध्ये बघायला मिळते. मेमफिसमध्येही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला पाहिजे, या उद्देशाने महाराष्ट्र मंडळाने दहा वर्षांपूर्वी गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. । अमेरिकेतील टेनेसी या राज्यातील मेमफिस हे एक सुंदर शहर. या भागात भारतीय लोकांची संख्यामोठी आहे. नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रापासून दूर यावे लागले, तरी आपले सण साजरे झालेच पाहिजेत, याबद्दलमंडळाचे कार्यकर्ते आग्रही आहेत. त्यामुळे मेमफिस महाराष्ट्र मंडळात गुढीपाडवा, संक्रांत, रामनवमी,दसरा, दिवाळी, असे सगळे सण उत्साहात साजरे केले जातात. गणेशोत्सव हा या मालिकेतील महत्त्वाचा सण. मंडळाने दहा वर्षांपूर्वी गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली. मंडळातील बहुतांश मराठी बांधवांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे मंडळाचा उत्सव एक दिवसाचा असतो. या दिवशी मराठी लोकांबरोबरच भारतातील विविध राज्यांतीलबांधवही सहभागी होतात. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळे उत्साहाने विविध जबाबदारी उचलतात. उत्सवाच्या दिवशी लहान मुले, मोठ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, आरती तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजनअसते. यासाठी दर वर्षी एक संकल्पना निश्चित केली जाते. या वर्षी ‘युनिटी इन डायव्हर्सिटी’ ही संकल्पना आहे. उत्सवाला पाचशेहून अधिक नागरिक सहभागी होतात. दर वर्षी नागरिकांची संख्या वाढतेच आहे. महाराष्ट्रात गणपतीचे आगमन चार दिवसांपूर्वीच झाले आहे; पण मेमफिसमध्ये पुढच्या शनिवारी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. आयसीसीटी इंडियन कल्चरल सेंटर अॅण्ड टेम्पल यांनी गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. मंडळाचे कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत. बाप्पाच्या स्वागतासाठी मंडळातर्फे मंडळातील हौशी कार्यकत्यांनी महिनाभरापासून वाद्य वादनाचा सराव केला आहे. मिरवणुकीनंतर गणपतीची प्रतिष्ठापना करून यथोचित पूजा करण्यात येणार आहे. या वेळी मंडळाच्या सभासदांनी बसविलेले सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. स्नेहा पाटील, अमित गंगाखेडकर, दीप्ती भंडारे आणि निधी माळी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. गणेशोत्सवाच्या नियोजनात अनेक हातांनी मदत केली आहे. (लेखक मेमफिस येथील महाराष्ट्रमंडळाचे अध्यक्ष आहेत.)शब्दांकन : चैत्राली चांदोरकर