पंचमुखी गणेशमूर्ती
पाच मुख व दहा हात असलेला गणपती व त्याच्या बरोबर असलेली स्त्रीरूपातील शक्ती हे महागणपतीचे लक्षण आहे हे आपण कालच्या लेखात पाहिले. या महागणपतीच्या प्रतिमेशिवाय पंचमुखी गणपतीच्या इतरही मूर्ती आढळतात. भारताच्या विविध भागात सापडणाऱ्या या वैशिष्टयपूर्ण मूर्तींचीओळख आपण करून घेणार आहोत.
यक्षविनायक या नावाने प्रसिद्ध असलेली काशीची गणेशाची मूर्ती पंचमुखी व चार हातांची आहे. या गणपतीला पाच मुख दाखवलेले असून त्यांचे कान आणि दातही वेगवेगळे दाखवलेले आहेत. या विनायकाच्या मधल्या मुखाच्या दातावर बारीक हत्ती कोरले आहेत. गणपतीच्या चार हातांपैकी दोन हातातसर्प आणि अंकुश आहेत. दातावरचे कोरलेले हत्ती हे या मूर्तीचे वैशिष्ट्य मानले जाते. संशोधकांनी गणेशसहस्रनामातील ‘दंष्ट्रालग्न व्दिपघटः’ (म्हणजे ज्याच्या दाताला व्दिप म्हणजे हत्तीची घटा लागलेली आहे असा) या पदाशी लावला आहे. अर्थात याचे स्पष्टीकरण अजून कुठल्याहीकथेत मिळालेले नाही.
हेरंब हे गणेशाचे नाव आपल्याला माहित असले तरी कोणत्या लक्षणानुसार गणेशाच्या प्रतिमेला हेरंब म्हणायचे हे प्राचीन ग्रंथातून नमूद केले आहे. पंचमुख, दहा हात असलेला व सिंहावर आरूढ असलेल्या गणेशाच्या प्रतिमेला हेरंब म्हणाले जाते. काही ग्रंथानुसार हा पंचमुखी वदशभुज गणेश उंदरावर बसलेला असला तरी त्याला हेरंब मानले जाते. या हेरंबाची चार मुखे चार दिशांना व पाचवे मुख त्यांच्या वर आकाशाकडे बघताना दाखवले जाते. ‘शारदातिलक तंत्र’ या ग्रंथामध्ये हेरंबाचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे, “सिंह ज्याचे वाहन आहे व ज्याच्या भाळावरचंद्र आहे अशा पंचमुखी व त्रिनेत्री हेरंबाचे मी ध्यान करतो.”
मुन्शीगंज, ढाका (बांगलादेश) येथे एक हेरंबाची काळ्या पाषाणात घडवलेली मूर्ती सापडली आहे. हि मूर्ती ललितासनात सिंहावर आरुढ झालेली आहे. या प्रतिमेला पाच मुखे असून प्रत्येक मुखाला तीन डोळे दाखवले आहेत. त्याच्या दहा हातात पाश, अंकुश, अक्षमाला, मोदकपात्र इ. दाखवलेआहेत.
शारदातिलक तंत्र या ग्रंथातील वर्णनाप्रमाणे हि मूर्ती हेरंबाची आहे हे स्पष्ट होते.
दिल्लीतील एका खाजगी संग्रहात एक लाकडी पंचमुखी गणेशाची प्रतिमा आहे. या गणपतीच्या हातात परशु, खड्ग, शंख, पाश, इ. वस्तू आहेत. आणि हा गणपती एका द्विमुख राक्षसाच्या खांद्यावर बसलेला आहे. हा राक्षस त्याच्या हाताने गणपतीचे पाय धरून ठेवत आहे अशी हि मूर्ती आहे. अर्थातजरी हा राक्षसावर आरूढ झालेला गणेश असला तरी काही संशोधक ह्याला हेरंब गणपती मानतात. अशा रीतीने एकाच पंचमुखी, दशभुज गणेशाची महागणपती, यक्षविनायक, हेरंब व राक्षसरूढ गणेश ही रूपे मध्ययुगीन काळात आपल्याला पाहायला मिळतात.
विविधरूपातून आपल्याला आढळणाऱ्या गणेश प्रतिमेचा भारतातील उगम आणि विकास आपण आत्तापर्यंत पहिला. या गणेश उपासनेचा प्रसार भारतीय उपखंड ओलांडून समुद्रापारही झाला होता. त्याचा इतिहास आणि गणेशप्रतिमेचा आग्नेय आशियातील प्रवास आपण पुढील काही लेखातून पाहणार आहोत.