लागोसमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह

पुणे : आफ्रिकेतील नायजेरिया येथे लागोसमध्ये गणेशोत्सवाचा मोठा उत्साह दिसून येत होता. लागोसमधील महाराष्ट्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने दाद दर वर्षी उत्सवात भाग घेतात. साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली. लागोस येथेच गणेशाची मूर्ती बनविण्यापासून उत्सवाला प्रारंभ केला जातो. भारतामधून गणेशोत्सवासाठी मूर्ती दर वेळी नेणे शक्य होत नसल्याने नायजेरियातीलच एका स्थानिक कलाकाराकडून मूर्ती तयार करून घेण्यात येते. यंदा लागोसमध्ये आम्ही साईबाबांच्या मंदिराची प्रतिकृती तयार केली आहे.या उत्सवानिमित्त लागोसमधील तसेच नायजेरियातील इतर भागांमधील भारतीय नागरिकएकत्र येतात. दररोज एकत्र आरती, अथर्वशीर्ष पठण केली जाते. उत्सवानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी लागोसमधील रोटरी क्लबचे सहकार्य लाभले होते. सत्यनारायणाची पूजा, तसेच स्वर यात्रा मंडळातर्फे भजनाचा शाका कार्यक्रम आयोजित करण्यात आलाआहे. त्याचप्रमाणे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रमही सादर करण्यात आले. जाऊ बाई जोरात हे विनोदी नाटक यंदालागोसमधील भारतीय नागरिक सादर करणार आहेत. मंडळाचे अध्यक्ष गिरीश जयकर, सांस्कृतिक कार्यक्रम सचिव पल्लवी संखे, देखाव्यासाठी मटकर आणि ग्रुप यांच्या देखरेखीखाली उत्सवाचे देखणे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवानिमित्त सर्व मराठी बांधव एकत्र येतात, उत्सवात आनंदाने सहभागी होतात. उत्सवानिमित्त एक स्नेहसंमेलनच होते. (लेखिका लागोस येथील महाराष्ट्रमंडळात कार्यरत आहेत.)