जल्लोष गणेशोत्सवाचा!

जल्लोष गणेशोत्सवाचा!

रथयात्रेचे आकर्षणपॅरिसमध्ये दक्षिण भारतीय धाटणीचे ३० वर्षे जुने गणेश मंदिर आहे. ला शापेल या भागात पंचमुखी गणपतीचे हे मंदिर स्थापिलेले आहे. गेल्या २५ वर्षांपासून गणेश चतुर्थीला या मंदिरापासूनमोठी रथयात्रा निघते. मंदिराच्या जवळच्या परिसरातून प्रदक्षिणा घालून यात्रेचा समारोप होतो.या यात्रेत भारतीयांबरोबरच परदेशी नागरिकांची संख्या लक्षणीय असते.

                 

डॉ. प्रियांका देवी-मारुलकरपुणे : विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाचे जसे सर्व भारतीयांना वेध लागतात; तसेच परदेशात राहणाऱ्या आम्हा भारतीयांना देखील गणेशोत्सवाचे वेध लागतात. घरच्या आठवणींबरोबरच भारतात अनुभवलेले गणेशोत्सवाचे दिवस आठवतात. घरापासून हजारो मैल दूर राहणाऱ्या आम्हा मराठी बांधवाना गणेशोत्सवाच्या वेळी घरची प्रकर्षाने आठवण येते. ही हुरहूर थोडी कमी व्हावी दादशव, आणि इथे राहून गणेशोत्सवाचा ! आनंद घेता यावा म्हणून महाराष्ट्र मंडळ फ्रान्स दरवर्षी अतिशय उत्साहाने गणेशोत्सव साजरा करते. भारताबाहेर अमेरिका, इंग्लड येथे गणेशोत्सव धामधुमीत साजरा केला जातो. फ्रान्समध्ये पूर्वी मराठी बांधवांची संख्या खूप नव्हती; पण गेल्या काही वर्षांत फ्रान्समधील मराठी बांधवांची संख्या वाढते आहे आणि त्याबरोबरच सण-समारंभ साजरे करण्याचा उत्साहसुद्धा तेवढाच वाढतो आहे.फ्रान्समधील महाराष्ट्र मंडळाने यंदा अकराव्या वर्षांत पदार्पण केले. मंडळाच्या गणेशोत्सवाचेही अकरावे वर्ष आहे. दर वर्षी उत्सवाच्या पहिल्या शनिवारी मंडळातर्फे गणेशोत्सव आयोजित केला जातो. या वर्षी शनिवारी १५ सप्टेंबरला मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला. यंदा गणेशोत्सव विशेष होता. आत्तापर्यंत छोट्या प्रमाणात होणारा हा उत्सव यंदा वाढत्या सभासदांच्या संख्येमुळे मोठे सभागृह घेऊन साजरा केला.कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या आवाहनाने झाली. मंडळाचे अध्यक्ष अमोल केळकर यांनी गणेशाची मूर्तीटाळ गजराच्या साथीने पूजेच्या स्थानी आणली. यानंतर पूजा आणि आरती करण्यात आली. गणेशाची आराधना आणि स्तुतीपर श्लोक, स्तोत्र, कथा, कविता आणि गीते अशी या वेळच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाची रूपरेषा होती. मंडळातील अनेक छोट्या मित्रांनी सादरीकरणात भाग घेऊन उत्तम कार्यक्रम सादर केले. संस्कृत श्लोक, मराठी गीते, भरतनाट्यम नृत्य, इंग्लिश कथा आणि नाटिका अशा वैविध्यपूर्ण सादरीकरणाने कार्यक्रम गच्च भरला होता. कार्यक्रमाला शंभरहून अधिक सभासद आणि पाहुण्यांनी हजेरी लावली होती. उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली. फ्रान्समध्ये सप्टेंबर हा शैक्षणिक वर्ष सुरू होण्याचा महिना असल्याने, तसेच गणेशोत्सव मराठी माणसांसाठी मोठा सण असल्याने महाराष्ट्र मंडळात अनेक नवीन सदस्यांची भर पडते. (लेखिका फ्रान्समधील महाराष्ट्रमंडळाच्यासदस्य आहेत.) (शब्दांकन : चैत्राली चांदोरकर)