Recipes For Ganeshotsav

विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता म्हणून कुठल्याही समारंभात आधी गणेशाचं पूजन करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. गणपती बाप्पा म्हणजे आपल्या घरी मुक्काम ठेवतात. कुणाकडे दीड दिवस, कुणाकडे पाच दिवस, कुणाकडे गौरी-गणपती, कुणाकडे दहा दिवस असा सगळ्यांच्या सोयीनं गणपती बाप्पा त्या-त्या घरी राहातो. बाप्पांच्या आरतीनंतर प्रसाद तर हवाच.

नारळाच्या करंज्या

साहित्य : ४ वाट्या नारळाचा पांढराशुभ्र चव, २ वाट्या साखर ,३ वाट्या मैदा ,दीड वाट्या रवा बारीक ,तेलाचे मोहन ६ टेबलस्पून ,मीठ चिमुटभर, २ टेस्पून तांदूळ पिठी, तळण्यास तूप,तेल ,वेलचीपूड ,१ टेबलस्पून दुध.

कृती : रवा, मैदा ,मीठ ,६ टेबलस्पून तेलाचे कडकडीत मोहन घालून घट्टसर भिजवावा .भिजल्यावर भरपूर मळावा.करतेवेळी फूडप्रोसेसोर मधून मळ्ल्यास कुटायची गरज नाही. नारळ चव, साखर एकत्रं घट्टसर शिजवावे .तेव्हाच तंदुल्पिठी घालावी .सारखे मिळून येईल.यात वाटल्यास दुधाची साय किंवा थोडे दुध घालून शिजवतात .खाली उतरवून वेलचीपूड घालावी. भिजविलेल्या कणकेच्या एकसारख्या लाट्या कराव्यात .पुरीपेक्षा जरा मोठी पारी लाटून मध्ये सारण भरावे. दोन्ही कडा दुधाच्या हाताने पक्क्या कराव्यात .कात्नीने अथवा दुमड घालून मुरडीच्या करंज्या करतात. ओल्या फडक्याखाली झाकून मंद आचेवर तेलात किंवा तुपात जरा जपून गुलाबी तळाव्यात.