- +1 (212)-695-1962
- info@elementskit.com
- 463 7th Ave, NY 10018, USA
विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता म्हणून कुठल्याही समारंभात आधी गणेशाचं पूजन करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. गणपती बाप्पा म्हणजे आपल्या घरी मुक्काम ठेवतात. कुणाकडे दीड दिवस, कुणाकडे पाच दिवस, कुणाकडे गौरी-गणपती, कुणाकडे दहा दिवस असा सगळ्यांच्या सोयीनं गणपती बाप्पा त्या-त्या घरी राहातो. बाप्पांच्या आरतीनंतर प्रसाद तर हवाच.
तयार दलिया किराणा दुकानात मिळतो. तो घ्या. १ वाटी दलिया असेल तर १ लिटर दूध लागेल. दलिया ३-४ तास भिजवून ठेवा. नंतर त्यात १ ते दीड वाटी गूळ आणि वाटीभर ओलं खोबरं घालून कुकरला चांगलं मऊ शिजवून घ्या. शिजवताना पुरेसं पाणी घाला नाहीतर मिश्रण फार घट्ट होतं. हे मिश्रण जरासं कोमट असताना त्यात जायफळ पूड घालून मग हँड मिक्सरनं चांगलं एकजीव करा. किंवा मिक्सरमध्ये फिरवून घ्या. थंड झाल्यावर त्यात दूध घाला. दूध घालून उकळू नका. कारण त्यात गूळ वापरलेला आहे. त्यात काजूचे भरपूर तुकडे घाला. फ्रीजमध्ये अगदी थंड करा.