Recipes For Ganeshotsav

विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता म्हणून कुठल्याही समारंभात आधी गणेशाचं पूजन करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. गणपती बाप्पा म्हणजे आपल्या घरी मुक्काम ठेवतात. कुणाकडे दीड दिवस, कुणाकडे पाच दिवस, कुणाकडे गौरी-गणपती, कुणाकडे दहा दिवस असा सगळ्यांच्या सोयीनं गणपती बाप्पा त्या-त्या घरी राहातो. बाप्पांच्या आरतीनंतर प्रसाद तर हवाच.

दुधीचा हलवा

दुधी भोपळा सालं काढून किसून घ्या. एका जाड बुडाच्या कढईत तूप तापवा. तूप तापलं की त्यावर कीस घाला. चांगलं हलवून झाकण ठेवा. मध्येमध्ये हलवत दुधी चांगला शिजू द्या. अर्धवट शिजत आला की दूध घाला. दूध आटत आलं की त्यात थोडी मिल्क पावडर, साखर, वेलची पूड आणि बदाम, काजूचे काप घाला. झाकण ठेवून मऊ शिजू द्या. वरून थोडं साजूक तूप घाला. मिल्क पावडर वापरायची नसेल तर मग ४-५ पेढे कुस्करून घाला. तसं केलंत तर साखरेचं प्रमाण कमी करा.