Recipes For Ganeshotsav

विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता म्हणून कुठल्याही समारंभात आधी गणेशाचं पूजन करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. गणपती बाप्पा म्हणजे आपल्या घरी मुक्काम ठेवतात. कुणाकडे दीड दिवस, कुणाकडे पाच दिवस, कुणाकडे गौरी-गणपती, कुणाकडे दहा दिवस असा सगळ्यांच्या सोयीनं गणपती बाप्पा त्या-त्या घरी राहातो. बाप्पांच्या आरतीनंतर प्रसाद तर हवाच.

अननस शिरा

१ वाटी रवा असेल तर एक वाटी टीनमधल्या अननसाचे बारीक तुकडे, हे तुकडे पाकवलेले असतात म्हणून अर्धी वाटी साखर वापरा. तूप गरम करून रवा चांगला खमंग भाजा. नंतर त्यात अडीचपट पाणी घाला. झाकण ठेवून तो चांगला फुलू द्या. मग साखर घाला. साखर विरघळली आणि शिरा चांगला मऊ झाला की त्यात बारीक चिरलेले अननसाचे तुकडे आणि केशर घाला. वरून परत थोडं साजूक तूप घाला. ताजा अननस वापरू नका. कडवट होईल.