- +1 (212)-695-1962
- info@elementskit.com
- 463 7th Ave, NY 10018, USA
पुण्यामध्ये आम्ही वाड्यामध्ये नऊकटंबे एकत्र येऊन गणपती उत्सव साजरा करीत होतो. मी, पत्नी स्मिता आणि प्रद्युम्नलाढालताशाची आवड असल्याने नदीकाठी या संस्थांचा सराव ऐकायला जात होतो. परदेशात आल्यावर आता गणेशोत्सवाची मजा अनुभवता येणार नाही, याची खंत होती. पण अॅडलेड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या निमित्ताने आम्हीऑस्ट्रेलियामध्ये राहून उत्सव साजरा करीत आहोत. – नीलेश खांडे
– मनीष कावळे, अॅडलेडप्रदूषण टाळण्यासाठी पुणेकरांकडून पर्यावरणस्नेही उत्सवाला प्रोत्साहन मिळत असताना यंदा अॅडलेड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळही या चळवळीत सहभागी होणार आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियातील अॅडलेड मंडळ यंदा कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहे. यासाठी खास मुंबईहून ही मूर्ती कुरिअरने दाखल झाली आहे. येत्या १५ आणि १६ स्पटेंबरला मंडळ गणेशोत्सव साजरा करणार आहे.दक्षिण ऑस्ट्रेलियातील अॅडलेड या भागात उत्साही गणेश भक्तांनी गणपती मंडळ स्थापन केले आहे. यंदा मंडळाचे सहावे वर्ष आहे.दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये एकच गणेश मंदिर आहे. तिथे ही मंडळी गणेशोत्सव साजरा करतात. मंडळ स्थापन झाले, त्या वेळी कार्यकत्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढून उत्सव साजरा केला. त्या वर्षी १४५ लोक उत्सवामध्ये सहभागी झाले. दुसऱ्या वर्षी संख्या वाढून २३८ पर्यंत पोहोचली. गेल्या वर्षी मंडळाच्या उत्सवामध्ये दीड हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. यंदा शनिवार आणि रविवारी (१५ आणि १६ सप्टेंबर) मंडळाचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे उत्सवासाठी मुंबईतून कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली मूर्ती मंडळाने घेतली आहे.सुशील हेगिष्टे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. दुर्गादास नाईक आणि शशिकांत साळके उपाध्यक्ष आहे. नंदकुमार गावकर यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे. अॅडलेड गणेशोत्सव मंडळाचेवैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील मंडळांचा उत्सवामध्ये सक्रिय सहभाग असतो. मंडळाने नुकतीच इको फ्रेंडली गणपती मूर्ती बनविण्याची कार्यशाळाही आयोजित केली होती. येत्या शनिवारी सकाळी उत्सवाला सुरूवात होणार असून हौशी कार्यकत्यांनी मिरवणूक, धार्मिक कार्यक्रमांची जय्यत तयारी केली आहे. सजावटीचे नियोजन तरुण मंडळी करीत आहेत. दोन दिवसांच्या या उत्सवात ३६ प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यासाठी लहान मुलांसह मोठ्यांची (लेखक ऑस्ट्रेलियातीलअॅडलेड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचेसमन्वयक आहेत.) (शब्दांकन : चैत्राली चांदोरकर)